11/30/2012

अपत्य

गाडी


11/26/2012

आतला आवाज



नारदमुनींना एकदा प्रश्न पडला की ‘माणसाचा जगात सर्वांत जवळचा मित्र कोणता?’ नारायणऽ नारायणऽऽ करीत नारदमुनी भगवान विष्णूकडे गेले. श्रीविष्णूंनी मिष्किल हास्य करीत म्हटले, ‘नारदा, आतल्या आवाजाला विचार?’ नारदमुनींना काही उलगडा होईना. तेव्हा श्रीविष्णू म्हणाले, ‘‘अरे, नारदा माणसाचा आतला आवाज म्हणजेच ‘आत्मा’ त्याचा सर्वात जवळचा मित्र असतो. जेव्हा सगळं जग तो सोडून जातो, अगदी देहसुद्धा जेव्हा सोडून जातो तेव्हा तोच तर सोबत असतो....’’ नारदमुनी भगवंतांना अडवत म्हणाले, ‘‘पण तो त्याचा आवाज ऐकत नाही.’’ अन् भगवंतांचे म्हणणे ऐकून घेण्यापूर्वीच नारायणऽ नारायणऽऽ करीत नारदमुनी निघाले. जाता जाता खरंच या भूलोकावरील माणसानं त्याच्या आतला आवाज ऐकला तर काय होईल, या कल्पनाविलासात रमण्याचा मोह नारदमुनींना आवरता आला नाही.

खरंच माणसानं आतला आवाज कायम ऐकायचा ठरवला तर..

..जगात कुठल्या समस्याच उरणार नाहीत. जन्म घेणार्‍या नव्या स्त्रीअपत्याची कोणी हत्या करणार नाही. कोणीही असत्य बोलणार नाही, दुष्कृत्य, पापकृत्य करणार नाही. कारण नेहमी त्याला आतला आवाज जागवित राहील.

...मेजाखालून कोणी द्रव्य लुटणार नाही. निवडणुकांमध्ये कोणीच कसलीही आमिषे दाखविणार नाही. इथल्या निवडणुका बिनविरोध होतील. तोडीस तोड दोन उमेदवार कोठे उभे राहिलेच तर इथला प्रत्येक नागरिक अधिक श्रेष्ठ उमेदवाराला मतदान करण्यासाठी घराबाहेर पडेल. सरकारच्या सगळ्या योजना तंतोतंत साक्षात् उतरतील. कारण प्रत्येकजण आपल्या आतील आवाज ऐकेल.

...मखमली तारुण्याला ‘हलकट’ म्हणण्याची कोणी हिम्मत करणार नाही. चित्रपटांकरिता उत्तान देहप्रदर्शन करणार्‍या नट्याच मिळणार नाहीत. अन् इथं कोणत्याही सेन्सॉरबोर्डाची गरज असणार नाही. सगळ्या चित्रपटगृहांत सर्व भाषांतील चित्रपट लागतील. कारण सगळेजण आपल्या आतील आवाज ऐकतील.

...वाहतुकीचे नियम कोणी कधीच तोडणार नाही. अन् दंडाची पावतीपुस्तके छापण्याची गरज पडणार नाही. मद्यप्राशन करून कोणी वाहन चालविणार नाही. त्यामुळे अपघात घडणार नाहीत. सगळीकडे शुद्ध, सात्विक अन् निर्मळ धान्य मिळेल. त्यामुळे कोणी आजारी पडणार नाही. अपघात नाही, आजारपण नाही त्यामुळे इस्पितळांची गरज भासणार नाही. कारण प्रत्येकाने आपल्या आतील आवाज ऐकत असेल.

...घरातून बाहेर पडल्यावर पुन्हा घरी परतण्याची शाश्वती अधिक बळावेल. जगातील कोणत्याही कोपर्‍यात कोणीही दहशतवादी कधीच जन्म घेणार नाही. शस्त्रास्त्रे बनविण्यार्‍या कारखान्यांची गरज पडणार नाही. बॉम्बस्फोट, दंगल, हत्याकांड कधीच घडणार नाहीत. इथल्या ‘सर्वसामान्यांना’ हळहळ व्यक्त करण्याची गरज पडणार नाही. कारण प्रत्येकजण आपल्या आतला आवाज ऐकत असेल.

...घराघरात मांगल्याचे, संस्कारांचे, मूल्यांचे धडे मिळतील. प्रत्येकजण आपल्या माता-पित्यांना वंदनीय मानेल. वृद्धाश्रमांना टाळा लावावा लागेल. कोणीही भांडणं करणार नाहीत. त्यामुळे ती निवारण्यासाठी कोणत्याही व्यवस्थेची गरज उरणार नाही. कारण प्रत्येकजण आपल्या आतला आवाज ऐकत असेल.

...शाळा-कॉलेजं निव्वळ ज्ञानाची मंदिरं बनतील. तिथं केवळ गुणवंतांना प्रवेश मिळेल. तिथले शिक्षकवृंद ज्ञानामृताचे दान विद्यार्थ्यांच्या ओंजळीत भरतील. तिथं ज्ञानेश्वर, तुकाराम जन्म घेतील. कारण प्रत्येकजण आपल्या आतला आवाज ऐकेल.

...हे सगळं पाहून निसर्गही आपला आतला आवाज ऐकेल. पाऊस वेळेवर पडेल, पिकं वार्‍यावर डौलानं डोलू लागतील. इथल्या नद्या, समुद्र, आकाश, धरणी कधी आपल्या मर्यादा सोडणार नाहीत. अन् त्सुनामीची लाट कधीच उसळणार नाही. जमीन दुभंगून भूकंप कधी होणार नाही. कारण त्यांनीही आपल्या आतला आवाज ऐकला असेल.

...बघता बघता प्रत्येक देश ‘परमवैभवा’च्या परमोच्च शिखरावर पोचला असेल. त्यावेळी जगातील कोणतेही राष्ट्र कधीही कोणत्याही राष्ट्रावर आक्रमण करणार नाही. कारण त्यांनीही आपल्या आतील आवाज ऐकला असेल.

...अचेतनाला चेतना मिळेल. अनितीला मोक्ष मिळेल. असत्याला अंधार मिळेल. सत्याला प्रकाश मिळेल. प्रकाशाला तेज मिळेल. त्या तेजातून दिव्यत्वाची प्रचिती मिळेल... सारी सृष्टी दिव्य तेजाने झळाळून निघेल...

इतक्यात नारदमुनींची तंद्री भंगली. अन् ते म्हणाले, ‘‘या नश्वर जगातील हा माणूस कधी आपल्या आतला आवाज ऐकेल का?’’

हातोड्याचे घाव


यश


पलीकडे...


11/19/2012

मौनाची शिक्षा


दु:ख आणि निर्मिती


स्वचैतन्य


यशाची रात्र

11/17/2012

सुखाचे क्षण


सत्व आणि तत्व


11/16/2012

ध्यास मराठी, श्र्वास मराठी



11/13/2012

दीपावली अभिष्टचिंतन


11/12/2012

हाडामासांचा माणूस


इश्वराचे अधिष्ठान..

इश्वराचे अधिष्ठान 

11/09/2012

बापाची कविता

बापाची कविता..





गणपती बाप्पाला विनंती


Related Posts Plugin for WordPress, Blogger...