4/12/2013

प्रिय राखीस




प्रिय राखीस,

एरवी आम्ही तुला ‘धागा’ म्हणून ओळखतो. पण हिरव्यागार श्रावणात तू रंगीबेरंगी वेष धारण करून भावा-बहिणीच्या आमच्या नात्याला बहर आणतेस. या जगात असलेल्या अन् नसलेल्याही सगळ्याच भावांना बहिणीची आणि बहिणींना भावाची आठवण करून देण्याचं सामर्थ्य तुझ्याच कुठून गं येतं?
बहिणीच्या नाजूक हातातून, पंचारतींच्या ताटातून, तू थेट रक्त सळसळणार्‍या मनगटात विराजमान होतेस तेव्हा तुझा मिजास काय वाढतो ना! कदाचित त्या भावाचं मनगटातील रक्तसुद्धा हा आनंदसोहळा पाहण्यासाठी पळभर थांबत असावं.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...