आनंदयात्रीबद्दल…

व्यंकटेश कल्याणकर
आशय व्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान विभाग
पुणे महानगरपालिका, पुणे

डिजीटल मार्केटिंग प्रमुख, 
नवजीवन ऍग्रो, रायपाटण, ता. राजापूर, जि. रत्नागिरी


व्याख्याता (तंत्रज्ञान)
यशदा आणि अन्य शासकीय, निमशासकीय संस्था


शैक्षणिक आणि तांत्रिक गुणवत्ता
·         डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठाची संगणकशास्त्र विषयात प्रथम श्रेणीसह 2005 साली पदवी.
·         पुणे विद्यापीठाच्या संगणक व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका(Post Graduate Diploma in Computer Management) या अभ्यासक्रमात 2007 साली विद्यापीठात सर्वप्रथम.
·         पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्युट, पुणे येथून पत्रकारिता विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण.
·         व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचा डेस्क टॉप पब्लिशिंग हा अभ्यासक्रम प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण.
·         महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या इंग्रजी 40 श.प्र.मि. आणि मराठी 30 श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.





पूर्वानुभव
  • महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे येथील माध्यम व प्रकाशन केंद्रात सात वर्षे कार्यरत.
  • सकाळ माध्यम समूहाच्या दैनिक सकाळ (ऑनलाईन आवृत्ती) येथे तीन वर्षे उपसंपादक म्हणून कार्यरत.
  • सध्या पुणे महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील  सोशल मिडिया कक्षात आशय व्यवस्थापक म्हणून कार्यरत.

उल्लेखनीय कार्यकर्तृत्त्व
·      पुणे विद्यापीठाच्या संगणक व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका (Post Graduate Diploma in Computer Management) या अभ्यासक्रमात 2007 साली विद्यापीठात सर्वप्रथम.
  • शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल (विद्यापीठात प्रथम) पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त 2007 साली तत्कालिन महापौर मा.श्रीमती राजलक्ष्मी भोसले यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेत सत्कार.
  • यशदाच्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विकासामध्ये तंत्रज्ञानाचा वापर, ब्लॉग रायटिंग इत्यादी विषयांवर प्रात्यक्षिकांसह व्याख्यान. 
  • चपराक, पुणे प्रकाशित `सारांश कथा' हे लघुकथेचे पुस्तक प्रकाशित
  • आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ग्रामीण विकासात संतांची भूमिका, ग्रामीण युवकांसाठी संगणक प्रशिक्षणाची आवश्यकता आणि त्यातून रोजगार निर्मिती, आधुनिक तंत्रज्ञानाचा ग्रामीण विकासात उपयोग आदी विषयांवर भाषणे प्रसारित.
  • यशदाच्या माहिती अधिकार केंद्रामार्फत आयोजित माहिती अधिकार विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षणपूर्ण.
  • अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांकडून अमेरिकेत प्रकाशित होणार्‍या दिवाळी अंकाकरिता अंतर्गत रचना, टंकलेखन त्याचप्रमाणे तांत्रिक सहाय्य.
  • पुण्यातून प्रकाशित होणार्‍या मासिक चिंतन आदेश, मासिक एकता, पाक्षिक विकल्पवेध, पाक्षिक चपराक यांच्या दिवाळी अंकाकरिता लेखन.
  • ई-सकाळवरील `स्पर्श' हे ब्लॉग सदर आणि `शनिवारची बोधकथा' हे सकाळच्या सोशल मिडियासाठी खास लिहिलेले बोधकथेचे सदर विशेष लोकप्रिय.
  • फेसबुकवर गेल्या 8 वर्षांपासून सातत्याने उद्बोधनपर, प्रबोधनात्मक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रेरक विषयांवर आकर्षक पद्धतीने लिखान. त्याचप्रमाणे www.meanandyatri.blogspot.com या ब्लॉगवर सातत्याने लिखान.

कौटुंबिक पार्श्वभूमी आणि अन्य माहिती
·         पत्नी प्रा. प्रज्ञा कल्याणकर पुणे येथील हुजूरपागा कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत. प्रा. प्रज्ञा या व्यावसायिक सूत्रसंचालिका, उत्तम वक्ता. राज्यभरातील १५०+ वक्तृत्त्व स्पर्धांमधील विजेती स्पर्धक. आजतागायत सूत्रसंचालनाच्या  २००+ कार्यक्रमात सहभाग.
·         आई श्रीमती माया उत्तमराव कल्याणकर नारदीय कीर्तनकार व प्रवचनकार. महाराष्ट्रात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवास. वडील कै.श्री.उत्तमराव दिनानाथराव कल्याणकर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातून सेवानिवृत्त.
अन्य माहिती
·         कविता, कथा, ललित लेखनामध्ये विशेष रस. अनेक नियतकालिकांमधून ललित लेख, कथा, कविता प्रकाशित. 
·         तबला हे तालवाद्य वाजविण्याची आवड. भारतीय संगीत प्रसारक मंडळ, पुणे यांच्या संगीत प्रवेशिका पूर्ण (तबला विषयातील एकूण तीन वर्गाच्या परीक्षा) द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण.

ई-मेल: venkatesh.kalyankar@gmail.com

2 comments:

  1. आनंदयात्री व्यंकटेश कल्याणकर , आपण नक्कीच आनंदयात्री आहात. आज प्रथमच आपल लिखाण वाचल. “ प्रेम कधीच ’ भंग ’ होत नाही “ हा एकच लेख वाचून माझी खात्री पटली की, आपण खरोखर आनंदयात्री आहात. आपल लिखाण लाखोंना प्रेरणादायी ठरेल , हे निश्चितच .
    लेख वाचल्यानंतर कुतुहालापोटी सहज म्हणून आपल्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपली पूर्वपीठीका जाणून घेणं हा सुध्दा एक आनंददायी प्रवास आहे. आपल्या घडण्यात आपल्या प्रिय मातोश्री सौ. मायाताई यांचा नक्कीच मुलभूत सहभाग राहिलेला आहे, असे जाणवते. अगदी कमी वयात आणि अल्पश्या कालावधित प्राप्त परिस्थितीन आणि आपल्या सातत्यपूर्ण अभ्यासामुळे आपणास विशेष योग्यता प्राप्त झालेली आहे, याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील लोकसहभागासह असलेल्या आपल्या आनंददायी यात्रेस माझ्या अनेकानेक शुभेछा !

    ReplyDelete
  2. खूप छान आहे तुमचा ब्लॉग.
    पुलेशु

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...