4/08/2015

स्पर्श : आपला धर्म कोणता?

शाळेची घंटा वाजली. पालकांनी त्याला शाळेत आणून सोडले. रोजच्याप्रमाणे तो शाळेत शिकू लागला, खेळू लागला, धमाल करू लागला. बघता बघता शाळेच्या मध्यंतराची वेळ झाली. रोजच्याप्रमाणे सर्वांनी एकत्र डबे खायला सुरुवात केली. त्याच्या बऱ्याचश्‍या बालदोस्तांनी आज डब्यात स्वीट डिश आणली होती. कोणता तरी सण असल्याने ही स्वीट डिश डब्यात अवतरली होती. याच्या डब्यात मात्र कोणताही स्वीट पदार्थ नव्हता. मात्र आईने दररोजप्रमाणे काहीतरी खास पदार्थ देण्याचा प्रयत्न केला होता. तरीही रोज खास वाटणारा पदार्थ त्याला आज खास वाटत नव्हता. त्यामुळे तो थोडासा नाराज झाला. तसेच आपल्या डब्यात स्वीट डिश नसल्याचे कारण शोधू लागला. त्याला आईचा थोडासा रागही आला.

दरम्यान त्याने स्वीट डिशचे कारण आपल्या एका क्‍लोज फ्रेंडकडून जाणून घेतले. कोणता तरी सण होता असे त्याला समजले. काहीवेळाने त्याला शोध लागला की तो सण याच्या घरी नसतो. तो का नसतो? असा प्रश्‍न त्याला पडला. पुन्हा क्‍लोज फ्रेंड उपयोगी पडला. त्याला उत्तर मिळाले कि की त्याचा धर्म वेगळा आहे. मग तो कोणता आहे? हा प्रश्‍न त्याला स्वस्थ बसू देईना. अशातच मध्यंतर संपले आणि शाळा सुरू झाली. इवल्याश्‍या जिवाला ‘आपला धर्म कोणता?‘ हा प्रश्‍न स्वस्थ बसू देईना. मात्र, त्याच्या मनातील प्रश्‍नाचे उत्तर सापडले नाही. क्‍लोज फ्रेंडही त्याचं फारसं समाधान करू शकला नाही. आता हा प्रश्‍न आपल्या आईला विचारायचा, असा निग्रह करून तो शाळा सुटण्याची तसेच आईला भेटण्याची वाट पाहू लागला. बघता बघता शाळा सुटली. आई आली. आता तो ‘आपला धर्म कोणता?‘ हे विचारण्यासाठी धावत आईकडे जाऊ लागला. ज्याचं उत्तर त्याच्या आयुष्यावर परिणाम करणार होतं. आई त्याला कुठलं तरी एक नाव सांगणार होती. अर्थात्‌ आई खरंखुरं उत्तर देणार होती. पण ‘तू माणूस आहेस आणि माणुसकी हा तुझा धर्म आहे‘ असं आईचं उत्तर असेल का?

(Courtesy: esakal.com)

Related Posts:

  • अल्लाह की मर्जी। तो त्याच्या कुटुंबीयांसह एका मोठ्या शहरात राहात होता. त्याचं छोटं किराणा मालाचं दुकान होतं. त्याचं कुटुंब अगदी सर्वांशी मिळून मिसळून राहात होतं. परिस्थिती फार संपन्न नसली तरीही कुटुंब खाऊन-पिऊन सुखी होतं. घरात तो, त्या… Read More
  • माझी जात: माणूस, धर्म: माणुसकी तो संपन्न कुटुंबातील होता. त्याला चांगली नोकरी होती. आई-वडिल, पत्नी आणि एक मुलगी असे त्याचे सुखी कुटुंब होते. तो कर्तृत्वालाच देव मानणारा होता. त्याला जात, पात, धर्म, पंथ वगैरे वगैरे बंधने अजिबातच मान्य नव्हती. ही व्यवस्था ब… Read More
  • इतक्‍या पगारात कसे भागेल? तो चांगल्या कुटुंबातील होता. शिक्षणही चांगले झाले होते. एक चांगली कायम नोकरीही त्याला होती. मात्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी सुदृढ नव्हती. तरीही कुटुंब खाऊन-पिऊन सुखी होते. तो त्याचे आई आणि वडील असे त्यांचे कुटु… Read More
  • भाड्याचे घर "आठ हजार रुपये भाडे. तीस हजार रुपये डिपॉझीट. सोसायटी, लाईटबिल वेगळे. कमिनश दोन महिन्यांचे भाडे‘, भाड्याचे घर दाखवत इस्टेट एजंटाने व्यवहाराच्या गोष्टी सांगितल्या. त्यावर त्या दोघांनी ठीक आहे, म्हणत "काही कमी जास्त वगैरे..‘… Read More
  • हे अपंगत्व व्यवस्थेचे! साधारण सकाळचे अकरा वाजत होते. पंचायत समितीचे कार्यालयही उघडले होते. आज आठवड्याच्या कामाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कार्यालयात फारशी गर्दी नव्हती. कार्यालय तसे छोटेच होते. बहुतेकजण रजेवर असल्याने कार्यालयात केवळ एकच … Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...