12/12/2013

ती...





















मी तिच्या आयुष्यभर खूप मागे लागतो
अगदी आयुष्यभर
ती थांबत नाही, मला सापडत नाही
कधी गवसत नाही, दूरपर्यंत दिसत नाही
मी अगतिक होतो, अनामिक होतो
मी अगदी असह्य होतो,
तिला हे माहित असतं
तरी सुद्धा ती येत नाही,
ती अगदी निष्ठुर होते
शेवटी एका अनामिक क्षणी
ती मला कडकडून भेटते.
अगदी कधीच न जाण्यासाठी
मात्र मला तेव्हा ती नको असते.
कारण, हे वेडं जग तेव्हा मला ‘मृतदेह’
तर तिला ‘शांती’ म्हणतं…




Related Posts:

  • स्पर्श : तिचे यश तिची दहावीची परीक्षा पार पडली. आज तिचा दहावीचा निकाल समजणार होता. तरीही निकाल पाहण्यास जाताना तिला भीती वाटत होती. निकालावरून घरात कोणी काही बोलणारं नव्हतं. तिच्या घरात आई, बाबा आणि तिला एक लहान भाऊ होता. कुटुंब छोटं हो… Read More
  • 'आपलं ध्येय काय?' मोठ्या कष्टानं त्याचा बाप वैभव उभारण्याचा प्रयत्न करत होता. छोटे-मोठे नोकऱ्या, व्यवसाय पडेल ते काम करून बापाने पैसा जमविला. अलिकडेच शहराच्या जवळ जागाही खरेदी केली. आता त्यावर घर बांधण्याचं काम सुरु होतं. पत्नी आणि दोन मुल… Read More
  • "ब्लॉग रायटिंग'ने टाकली कात फेसबुक, ट्‌विटर, व्हॉट्‌सऍपच्या जमान्यात "ब्लॉग रायटिंग‘ मागे पडते की काय, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात वेगळेच चित्र आहे. प्रदीर्घ लेखन ऑनलाइन करण्याचे नवे माध्यम म्हणून "ब्लॉग रायटिंग‘ पुन्हा नव्याने समोर येत आहे.… Read More
  • 'माझी सुपारी घेशील का?' शाळेतील एक मॅडम रजेवर होत्या. त्यामुळे दुसऱ्या एका मॅडमना मोकळा तास घ्यावा लागला. त्या मॅडम त्या वर्गाला शिकवतही नव्हत्या. परंतु मोकळा आणि शेवटचा तास असल्याने मुख्याध्यापकांनी त्यांना तेथे पाठविले. वर्गात गोंधळ होता. मॅ… Read More
  • देवमूर्तीना विकायचे का? पोराच्या शिक्षणासाठी त्यानं खूप कष्ट घेतले. वडिलोपार्जित थोडीफार जमीन आणि देवघरात देवाच्या पुरातन अन्‌ दुर्मिळ मूर्ती होत्या. संपत्ती म्हणून केवळ राहतं घर आणि थोडीफार जमीन होती. जमिनीमध्ये किरकोळ पीके घेऊन त्यातच घरखर्च… Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...