5/06/2019

आयुष्याचा उत्सव व्हावा (नवी कविता)



लाथ मारुनी आव्हानांना
गंध यशाचा धुंद करावा
मिठित घ्यावी आपुली स्वप्ने
आयुष्याचा उत्सव व्हावा

तोच श्वास अन तीच हवा
पळ पळ भासो नित्य नवा
सजीव होण्या जिवंतपणा
आयुष्याचा उत्सव हवा

नको निराशा, नकोत मोह
स्वत: स्वत:चा सोडू डोह
जगणे आपुले सार्थ कराया
आयुष्याचा उत्सव व्हावा

कष्ट करा, गाळा घाम
नष्ट होतील सारे ताण
उंच होईल तुमची मान
आयुष्याचा उत्सव छान

होईल जेव्हा आपुला अंत
नयन मिटूया तेव्हा शांत
पाहून आपुला आयुष्य उत्सव
मरणाचाही होईल महोत्सव

व्यंकटेश कल्याणकर

Related Posts:

  • ग्रामीण विकासात आधुनिक तंत्रज्ञानाची उपयोगिता काळ्यारात्रीला पार करून शुभ्र सकाळ होते. सकाळी शेतकरी रानाकडे जातो. व्यापारी धनाकडे जातो. विद्यार्थी ज्ञानाकडे जातो. थोडक्यात काय तर माणूस आपल्या जगण्याकडे जातो. माणूस जगत असतांना सतत नाविन्याचा ध्यास घेत असतो. त्यासाठी वि… Read More
  • चल ना रे दादा पुन्हा लहान होऊ... (कविता) ताई दादाच्या नात्यावर प्रकाश टाकणारी कविता -… Read More
  • प्रेरणादायी विचार... (03) अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात  हे सारे विचार वाचून होतील.  मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल फेसबुकवर लिहिलेले काही प्रेरणादायी विचार.... (adsbygoogle = window.adsbygoogle || [])… Read More
  • प्रेरणादायी विचार... (04) अवघ्या पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात  हे सारे विचार वाचून होतील.  मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास अवघं आयुष्य कमी पडेल फेसबुकवर लिहिलेले काही प्रेरणादायी विचार.... (adsbygoogle = window.adsbygoogl… Read More
  • माहिती तंत्रज्ञान आणि ग्रामीण विकास मित्रहो, आज आपण माहिती तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक युगात वावरत आहोत. संगणकाच्या समोर बसून आपण जगातील घडामोडी प्रत्यक्ष  डोळ्यांनी पाहू शकतो. क्षणार्धात जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात विविध माध्यमातून संपर्क साधू शकतो. अगद… Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...