4/17/2015

फेस झाले बुक, अन्‌ कुठच मिळना सुख

फेस झाले बुक, अन्‌ कुठच मिळना सुख
आयटीमध्ये ऐटीत जगायची भागना आमची भूक
आईबापाला केले आम्ही जिवंतपणी विभक्त
पराक्रमाच्या पोवाड्यानं सळसळना आमचं रक्त

तोडली आम्ही तुळस अन्‌ सोडला आम्ही गाव
कुणाचा कुणालाच इथं लागना कसा ठाव?
हिरवा कंदिल पेटला की झाली आमची भेट
पाहिले नाही कित्येक दिवस सग्यासोयऱ्यांचे गेट

कसला आलाय सण अन्‌ कसला आलाय उत्सव
आमच्यासाठी चार भिंतीत स्वत:चाच महोत्सव
फेस झाले बुक, अन्‌ कुठंच मिळना सुख
आयटीमध्ये ऐटीत जगायची भागना आमची भूक...

वाटलं कधी खावं खमंग तर ऑनलाईन ऑर्डर
घरात असूनही होऊ लागला घरच्या चवीचा मर्डर
इंटरनेटवरूनच फिरतो आम्ही साऱ्या साऱ्या जगात
मग गरज काय कधी कोणाच्या डोकावयाची मनात

माणूस झाला खूप छोटा अन इंटरनेट झालं मोठं 

एवढ्या मोठ्या जगात समजेना काय खर काय खोट
फेस झाले बुक, अन्‌ कुठंच मिळना सुख
आयटीमध्ये ऐटीत जगायची भागना आमची भूक..


- व्यंकटेश कल्याणकर  

Related Posts:

  • फेस झालं बुक (कविता) 💫 फेस झालं बुक अन.. © व्यंकटेश कल्याणकर 🧐 फेस झाले बुक,  अन्‌ कुठच मिळना सुख आयटीमध्ये ऐटीत जगायची  भागना आमची भूक आईबापाला केले आम्ही  जिवंतपणी विभक्त पराक्रमाच्या पोवाड्यानं  सळसळन… Read More
  • बाबांची परी... (कविता) आज अगदी पहाटे पावणे तीन वाजता काम संपवत होतो. पहाटेची भयाण शांतता होती. दिवसभर वल्लरीचा गडबड गोंधळ चालू असतो. पहाटेच्या शांततेतही तिचा किलबिलाट माझ्या कानात घुमत होता. तेव्हा अगदी १०-१५ मनात आलेले भाव कवितेच्या रूपात शब्दांतू… Read More
  • फेस झाले बुक, अन्‌ कुठच मिळना सुख फेस झाले बुक, अन्‌ कुठच मिळना सुखआयटीमध्ये ऐटीत जगायची भागना आमची भूकआईबापाला केले आम्ही जिवंतपणी विभक्तपराक्रमाच्या पोवाड्यानं सळसळना आमचं रक्ततोडली आम्ही तुळस अन्‌ सोडला आम्ही गावकुणाचा कुणालाच इथं लागना कसा ठाव?हिरवा कंदि… Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...