एका संस्थेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू होते. इमारतीचा परिसर निवासी असल्याने गजबलेला होता. इमारती जवळ जवळ होत्या. बांधकामाकरिता आवश्यक असणारा कच्चा माल शेजारील एका बंगल्याच्या दारात उतरविण्यात आला.
तेवढ्यात त्या बंगल्याचा मालक बाहेर आला आणि बांधकामावर देखरेख करणार्या कार्यकर्त्यांवर ओरडू लागला. बोलता बोलता त्यांचे वाद वाढत गेले. कार्यकर्ता त्या बंगला मालकाला कोर्टात खेचण्याची भाषा करू लागला. दरम्यान इतर कार्यकर्त्यांनी संस्थाप्रमुखांना बोलावून घेतले. संस्थाप्रमुख आले आणि त्यांनी त्या कार्यकर्त्याला बाजूला नेण्यास सांगितले. बंगला मालकासमोर संस्थाप्रमुख हात जोडून म्हणाले, ‘‘आपणांस आमच्यामुळे त्रास होत आहे, त्याबद्दल आम्ही आपले दिलगीर आहोत. 1-2 तासात आपल्या बंगल्याच्या दारातील माल आम्ही इतरत्र हलवतो आणि जागा पूर्ववत स्वच्छ करून देतो. कृपया आपण केवळ 1-2 तास सहकार्य केल्यास आम्ही आपले आभारी राहू.’’ एवढ्या नम्रपणाने बोलल्याने बंगला मालकही वरमला आणि त्याने ‘‘ठीक आहे, ठीक आहे’’ म्हणत सहकार्य केले.
संस्थाप्रमुख त्या कार्यकर्त्याजवळ येऊन म्हणाले, ‘‘आपले ध्येय ही इमारत बांधणे आहे, या माणसाशी भांडत बसणे नव्हे!’’
बोध: जीवनातील टाळता येणार्या छोट्या-मोठ्या गोष्टींकरिता ऊर्जा खर्च न करता आपण आपल्या मुख्य ध्येयाकडे लक्ष केंद्रित करायला हवे.

0 comments:
Post a Comment