त्याने पदवी प्राप्त केली होती. कौटुंबिक
पार्श्वभूमी फारशी चांगली नव्हती. पण धडपडण्याची जिद्द होती. प्रयत्नांची
पराकाष्ठा करण्याची तयारी होती. शिक्षणाच्या निमित्ताने तालुक्याच्या
ठिकाणावरून जिल्ह्याच्या आणि आता जिल्ह्याच्या ठिकाणावरून तो एका महानगरात
दाखल झाला होता. या शहरातील झगमगाट पाहून त्याला किंचितशी भीतीही वाटत
होती. आपला टिकाव लागेल का? आपण स्वत:ला सिद्ध करू शकू का? पण तरीही प्रबळ
इच्छाशक्तीमुळे तो प्रयत्न करत राहिला. धडपडत राहिला. त्याला डॉक्टरेट
करायची होती. मात्र, उदरनिर्वाहासाठी नोकरी करणे अपरिहार्य होते. नोकरीसाठी
तो अनेक ठिकाणी फिरला. पण बऱ्याच ठिकाणी त्याला स्वत:चे आडनावच अडचणीचे
ठरत होते.
शेवटी अनेक ठिकाणी फिरल्यानंतर एका कनिष्ठ महाविद्यालयात त्याला सहायक प्राध्यापकाची छोटीशी नोकरी मिळाली. अर्थात तेथेही जाचक अडचणी होत्या. कागदोपत्री असणारा पगार हातात येत नव्हता. आणि कॉट्रॅक्ट असल्याने कामाचा व्यापही मोठा होता. तरीही तो आनंदाने काम करत होता. अशातच वर्ष उलटले. तो हळूहळू शहराच्या वातावरणात रूळू लागला. एकदा त्याने जवळच्या एका सहकाऱ्याला डॉक्टरेट करण्याची इच्छा बोलून दाखविली. त्याने एक जबरदस्त उपाय सुचविला! तसेच अशा वातावरणात हा उपाय केला नाही तर तुझे सगळे आयुष्य "कॉट्रॅक्ट‘वर काम करण्यात वाया जाईल अशा धोक्याची इशाऱ्याबाबतही सांगितले.
त्याने महिनाभर खूप विचार केला. मात्र, त्याला दुसरा कोणताही मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे सहकाऱ्याने सांगितलेला उपाय करण्यासाठी तो नाईलाजानेच तयार झाला. मात्र, अल्पावधीतच त्याला त्या उपायाचा अपेक्षित फायदा झाला. ही नोकरी सोडून तो आता दुसऱ्या महाविद्यालयात रूजू झाला. तेथे पगारही पूर्वीपेक्षा बरा मिळू लागला. बघता बघता याने डॉक्टरेटला प्रवेशही घेतला. त्याला हवा तो विषय आणि हवा तोच मार्गदर्शक मिळविण्यातही यश मिळाले. दिवस जात होते. याची धडपडही सुरु होती. बघता बघता याची डॉक्टरेट पूर्ण होण्याची वेळ आली. पण तरीही आपण जे करतोय ते योग्य की अयोग्य? असा प्रश्न अस्वस्थ करत होता.
***
आज एका निवांत क्षणी तो मागे वळून पाहत होता. काय जालीम उपाय सुचवला होता मित्रानं. एवढ्या मोठ्या महानगरात किती छान निभाव लागला आपला? छोटी नोकरी. नंतर थोडी मोठी नोकरी. डॉक्टरेट. त्यानंतर विभाग प्रमुख. आणि आता प्राचार्य. डॉक्टरेटच्या प्रबंधाचे पेटंट. एवढे सारे पदरी होते. दरम्यानच्या काळात प्राध्यापक पत्नीही मिळाली. संसारही थाटला. घरही झालं. किती बदललो आपण गेल्या काही वर्षांत! पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी, निभाव लागण्यासाठी मित्रानं सांगितल्याप्रमाणे आडनाव बदलण्याचा जालीम उपाय केला. केवळ आडनावाच बदललं नाही, तर चालण्या-बोलण्याची, राहण्या-खाण्याची रीतही बदलली आपण. जे लोक आपल्यापासून तुटक वागत होते, त्यांचाच तथाकथित सुसंस्कृतपणा, शिष्टाचार किती हुबेहूब अंगिकारला. म्हणूनच का त्यांना माझ्यासारखा परका आपलासा वाटू लागला? जाऊ द्या! पण एवढं करून आपलं ईप्सित साध्य केलंच! उद्या एका आंतराष्ट्रीय व्यासपीठावर अभूतपूर्व सोहळ्यात आपल्या कर्तृत्वाचा सन्मान केला जाणार आहे. म्हणून तो कितीतरी वेळ गतकाळातील आठवणीत रमत स्वत:शीच बोलत राहिला...
***
आज देशाच्या राजधानीतील एका मोठ्या समारंभात त्याच्या कामगिरीबद्दल सत्कार समारंभ सुरु होता. तो मोठ्या सन्मानाने व्यासपीठावर विराजमान झाला. उपस्थित दिग्गज त्याच्या कामगिरीचे कौतुक करत होते. परंतु अशा या सोहळ्यातही ज्यानं आडनाव बदलण्याचा जालीम उपाय सुचविला होता त्याची आठवण त्याला झाली. तो जुना सहकारी सध्या कुठं असतो असा प्रश्न याच्या मनात अचानकच चमकला. सध्या त्याचा काहीही ठावठिकाणा माहित नव्हता. त्यानेही आडनाव बदलण्याचा उपाय केला असेल का? तो ही यशस्वी झाला असेल का? अशा अनेक प्रश्नांचं काहूर त्याच्या मनात माजलं. अशातच पुन्हा पूर्वीचे आडनाव धारण करण्याचा विचार त्याच्या मनाला स्पर्शून गेला. पूर्वीचे आडनाव धारण केले तर माझ्या यशाची उंची हीच राहील? माझं वलय टिकून राहील का? लोकांचा दृष्टीकोन हाच राहील का? माझ्या गुणवत्तेवर कोणी संशय घेईल का? हे यश माझं आहे की माझ्या बदललेल्या आडनावाचं?
समोर स्वत:चाच कौतुक सोहळा सुरु असताना अशा साऱ्या विचारांचा गोंधळ त्याचा मनात सुरू होता. पण काही केल्या पुन्हा पूर्वीचे आडनाव धारण करावे का? याचा निर्णय होत नव्हता.
***
(Courtesy : www.esakal.com)

0 comments:
Post a Comment