एक व्यक्ती काही गाढवांना घेऊन दुसऱ्या गावाला निघाला होता. प्रवास दूरचा होता. दिवस उन्हाळ्याचे होते. गाढवेही बरीच होती. त्यामध्ये काही वृद्ध गाढवेही होती. प्रवासादरम्यान ते एका मोकळ्या रानात पोचले. तेथून जात असताना शेजारीच एक कोरडी विहिर होती. पुढे जाताना एक वृद्ध गाढव पाय घसरून रिकाम्या विहिरीत पडले. विहीर खूप खोल होती. त्यामध्ये अजिबात पाणी नव्हते. त्या व्यक्तीने गाढवाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. जवळ असलेल्या साहित्याने त्याला वर काढण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही.
शेवटी त्या व्यक्तीने आजूबाजूच्या शेतातील लोकांना मदतीसाठी याचना केली. लोक आले. त्यांनीही पुरेसे प्रयत्न केले. पण गाढव वर येऊ शकले नाही. संध्याकाळ झाली. अंधार पडू लागला. त्यामुळे मदतीसाठी आलेल्या लोकांनी गाढवाला येथेच सोडून पुढे जाण्याचा सल्ला दिला. जाण्यापूर्वी वृद्ध गाढवावर माती टाकून त्याला या विहिरीतच गाडण्याचा सल्लाही त्यांनी दिली. सगळेजण निघून जाऊ लागले. तो व्यक्ती विचार करू लागला. हा गाढव वृद्ध झालेला आहे. शिवाय हा मेल्यावर याला गाडायचा प्रश्न आहेच. त्यामुळे येथेच याच्या अंगावर माती टाकून त्याला गाडून पुढे जाण्याचा निर्णय त्या व्यक्तीने घेतला. त्यासाठी त्याने निघून जात असलेल्या लोकांना माती टाकण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. लोकही मदत करण्यास तयार झाले. सर्वजण मिळून विहिरीत माती टाकण्याचा प्रयत्न करू लागले. पाहता पाहता विहिरीत माती पडू लागली.
विहिरीत अडकलेल्या गाढवाला वर काय होत आहे हे काहीच समजत नव्हते. "इतका वेळ आपल्याला वाचविण्याचा प्रयत्न करणारे आता आपल्या अंगावर माती का टाकत आहेत?', असा विचार ते करू लागले. पण त्याला काही कळले नाही. पण वरून अंगावर पडणारी माती ते झटकून तिच्यावर उभे राहू लागले. बघता बघता अशी खूप माती जमा पडू लागली. मातीचा ढीग तयार होऊ लागला. गाढव त्या ढिगावर चढू लागले. माती वाढत होती. ढीगही उंच होत होता. गाढवही अंग झटकून त्यावर चढत होते. खूप वेळानंतर ढीग एवढा मोठा झाला की ढीगावर उभे राहून गाढव सहजपणे विहिरीच्या बाहेर आले.
(शब्दांकन: व्यंकटेश कल्याणकर)
(Courtesy: eSakal.com)