4/09/2016

होकार, नकार, होकार!

दि. 10 डिसेंबर

नमस्कार,

मला जे सांगायचं आहे ते समोरासमोर सांगता येत नाही म्हणून मुद्दामच हे पत्र लिहित आहे. मागच्या महिन्यात आपलं ऍरेंज मॅरेज ठरलं. तू खूप छान मुलगा आहेस. सगळ्याच बाबतीत चांगला आहेस. तू मला आवडत नाहीस असेही नाही. आपला कांदा पोह्याचा कार्यक्रम झाला. दोन्हीकडून ग्रीन सिग्नलही आला. ऑफिशिअली सगळं ठरलं. त्यानंतर आपण दोन-तीनदा भेटलोही.

पण सॉरी... तुला खूपदा सांगावेसे वाटले. पण हिम्मत नाही झाली. घरच्यांच्या दबावामुळे आणि आणखी बऱ्याच गोष्टींमुळे. मी ज्या कंपनीत काम करते त्या कंपनीतील एक मुलगा मला खूप आवडतो. गेले सात-आठ महिन्यांपासून आमची मैत्री आहे. दोन महिन्यांपूर्वीच आमच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. पण आम्ही सर्व मर्यादा पाळल्या आहेत. तो दुसऱ्या राज्यातील असल्याने घरच्यांना अजून सांगितले नाही. पण आता सांगणार नाही. त्यापूर्वी तुला कळवत आहे. प्लिज गैरसमज करून घेऊ नको. तू खूप छान आहेस. तुला चांगली मुलगी मिळेल.

थॅंक्‍स!

तुझी न होऊ शकलेली

-----
दि. 12 जानेवारी

नमस्कार,

मला मनापासून माफ कर. मागील महिन्यात जे पत्र पाठवलं त्यामुळं खूप वाद झाले. तुझ्याकडे आणि माझ्याकडेही. पण आता मला वास्तवाची जाणीव झाली आहे. ज्या मुलावर माझे प्रेम होते, त्याने मला धोका दिला. काही कारणास्तव त्याने लग्नाला स्पष्ट नकार दिला. तो अत्यंत स्वार्थी असल्याचे मला नंतर समजले. अर्थात मागे सांगितल्याप्रमाणे मी सर्व मर्यादा पाळल्या होत्या. मात्र साऱ्या प्रकारामुळे मी खूप डिस्टर्ब झाले होते. घरातल्या वादामुळं माझी अवस्था प्रचंड वाईट झाली होती. आता थोडी सावरतेय. तू खरचं खूप चांगला मुलगा आहेस. खरं तर मी पुन्हा तुला लग्नासाठी मागणी घालणं योग्य नाही. घरच्यांच्या मार्फततर अजिबातच नाही. पण तरीही दोन-तीन वेळा भेटल्याने हिम्मत करून मी तुला पुन्हा मागणी घालत आहे. मला स्वीकारणं अथवा नाकारणं हा संपूर्णत: तुझाच निर्णय असेल आणि तो मला डोळे झाकून मान्य असेल.

पुन्हा एकदा सॉरी!

तुझी होण्याची इच्छा असलेली

---
दि. 1 फेब्रुवारी

नमस्कार,

तुझे पत्र मिळाले. तुझा थोडासा रागही आला. पण तुझ्या प्रामाणिकपणाचे कौतुक वाटले. सारे काही तू मान्य केलेस. आयुष्यात माणसं ओळखण्यात बऱ्याचदा चुका होतात. पण तू चूक कबूल केलीस. सावरायचा प्रयत्न केलास. मलाही बरोबर ओळखलेस. म्हणूनच पुन्हा मागणी घालण्याचे धैर्य केलेस. मी खुल्या दिलाचा माणूस आहे. तू ही छानच आहेस. किंचित अल्लड आहेस. मला आवडलीस. मला आवडत राहशील. पुढचं सगळं फोनवर बोलून ठरवू.

तुझाच,

Related Posts:

  • कोणी मुलगी देता का मुलगी? लग्न करावं की करू नये हा एकच सवाल आहे. या प्रपंच्याच्या चक्रव्युहात फाटक्या संसाराचा गुलाम बनून, बायको आणि आईची समजूत घालत बसावं आयुष्यभर आणि जगावं बेशरम लाचार आनंदानं.. की फेकून द्यावी या तारुण्याची उमेद लग्नाचा विचार न … Read More
  • लहानपणीचे क्रिकेट एका छोट्या शहरातील एका मोठ्या माळवदांच्या दोन मजली वाड्यात पाच-पंचवीस बिऱ्हाडं राहात होती. वाड्याच्या अंगणात ऐसपैस रिकामी जागा होती. त्याला चौक म्हटले जायचे. वाड्याला मोठे दार होते. दाराच्या बाहेर बरीचशी रिकामी जागा होत… Read More
  • 'आम्हाला आत्महत्या करायची आहे!' तो पदवीधर होता. चांगली नोकरीही होती. त्याच्या घरची परिस्थितीत संपन्न होती. तो एका मैत्रिणीच्या प्रेमातही पडला होता. तिचीही परिस्थिती चांगली होती. पण दोघांमध्ये भेदाभेदाच्या मोठमोठ्याला भिंती उभ्या होत्या. त्या भींती पार… Read More
  • स्पर्धा परीक्षांचे जग पेढ्याचा बॉक्‍स घेऊन तो अभ्यासिकेच्या दारात आला. संध्याकाळची वेळ असल्याने सगळा ग्रुप बाहेरच उभा होता. "हे घ्या पेढे. काल रिझल्ट लागला. गावाकडे होतो. मेन्सपण क्‍लिअर झालो. मुलाखत पण छान झाली. क्‍लास वनची पोस्ट मिळाली आहे‘… Read More
  • देशप्रेम आणि गप्पा त्यांचा आठ जणांचा ग्रुप होता. त्यामध्ये तीन मुलीही होत्या. प्रत्येकाची आवड-निवड, विचार वेगवेगळे होते. तरीही कॉलेजपासून त्यांची चांगली मैत्री होती. जमेल तेव्हा सगळेजण एकत्र भेटत असत. रोज त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर मोबाई… Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...