5/15/2019

सात्विक दान (बोधकथा)

एकदा बुद्धांचे एका गावात आगमन झाले. तेथील राजाने त्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर गावातील सर्व जण बुद्धांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागले. बुद्धांना सगळेजण वेगवेगळ्या भेटवस्तू देऊ लागले. त्यामध्ये मौल्यवान दागिने, कपडे आदींचा समावेश होता. राजानेही अत्यंत मौल्यवान भेटवस्तू दिली. बुद्ध सगळ्या भेटवस्तूंना केवळ उजव्या हाताने स्पर्श करून त्या स्वीकारत होते.



काही वेळाने एक अतिशय साधारण वस्त्रे परिधान केलेली वृद्ध महिला बुद्धांना भेटायला आली. तिने बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाली, "माझी परिस्थिती काही चांगली नाही. मी अत्यंत गरीब आहे. रानातील फळे वगैरे गोळा करून, ती विकून मी माझा उदरनिर्वाह करते. आज हे डाळिंब खात असताना तुम्ही गावात आल्याचे समजले आणि मी तशीच तुम्हाला भेटायला आले. आता माझ्याकडे देण्यासारखे काहीच नाही. फक्त हे उष्टे (अर्धवट खाल्लेले) डाळिंब माझ्याकडे आहे. खरं तर हे डाळिंब तुम्हाला दान करण्यात मला संकोच वाटत आहे. तुम्हाला ते स्वीकारण्याचा आग्रहही मी करणार नाही. मात्र तुम्ही ते स्वीकारलेत तर मी कृतार्थ होईल.' वृद्ध महिलेची ही सारी अवस्था पाहून बुद्धांनी दोन्ही हात पुढे केले आणि तिच्या हातातील डाळिंब आनंदाने स्वीकारले. एवढेच नव्हे तर डाळिंब खाण्यासही सुरूवात केली.

हे दृश्‍य पाहून राजा पुढे आला आणि तो बुद्धांना म्हणाला, "माझ्यासह सर्वांनी तुम्हाला अत्यंत मौल्यवान भेटवस्तू दिल्या. त्या तुम्ही स्वीकारल्यात. पण फक्त उजव्या हाताचा स्पर्श करून. मात्र या वृद्धेने दिलेले उष्ट्या फळाचे दान तुम्ही दोन्ही हातांनी स्वीकारलेत आणि खाल्लेतही. आमचे दान एका हाताने आणि वृद्धेचे दोन्ही हातांनी? हे असे का?' राजाचे हे म्हणणे ऐकून बुद्धांनी अगदी शांतपणे उत्तर दिले. बुद्ध म्हणाले, "हे राजा, तुम्ही साऱ्यांनी जे दान केलेत तो तुमच्या संपत्तीतील दहावा हिस्सादेखील नव्हता. तुम्ही मला गरज नसतानाही हे दान दिलेत. तुम्ही हे सारे दान गोरगरिबांच्या कल्याणासाठीही वापरू शकला असता. मात्र तुम्ही तसे न करता ते मलाच दिलेत. उलट या वृद्धेने जे दान केले आहे तो तिच्याकडे आज असलेल्या संपत्तीचा संपूर्ण भाग होता. हे डाळिंब दिल्यानंतर तिच्याकडे आजसाठी काहीही उरणार नाही, हे ठाऊक असूनही तिने अत्यंत श्रद्धापूर्वक अंत:करणाने हे दान दिले. तिला संपत्तीचा कोणतीही मोह नाही. तिचे हे दान मोहविरहित असल्याने तुमच्यापेक्षा अधिक सात्विक दान ठरले.'

बुद्धांनी या प्रसंगातून दिलेला संदेश ऐकून सगळीकडे शांतता पसरली.

Related Posts:

  • सर्वव्यापी 'क्‍यूआर कोड' (वेबटेक) लेखकाच्या मोबाइल क्रमांकासाठी क्यूआर कोड स्कॅन करा. माणसाच्या कल्पनाशक्तीची आणि बुद्धीची अफाट शक्ती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोज अनुभवास येत असते. कमीत कमी श्रमात अपेक्षित उद्दिष्ट गाठून अत्यल्प वेळात कार्य सिद्धीस … Read More
  • स्पर्श : उत्तर आकाशातील लाल गोळा खाली जात होता. तर याच्या पोटात भुकेचा गोळा उगवत होता. संपूर्ण दिवस दोन कटिंगवर काढत तो खूप धावला होता. रविवारी रस्त्यावर गर्दी असल्याने त्याने विकायला आणलेली खेळण्यातील "विमाने' सिग्नलवर थांबूनच चांगली … Read More
  • 'आडनावात काय आहे?' त्याने पदवी प्राप्त केली होती. कौटुंबिक पार्श्‍वभूमी फारशी चांगली नव्हती. पण धडपडण्याची जिद्द होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी होती. शिक्षणाच्या निमित्ताने तालुक्‍याच्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या आणि आता जिल्ह्य… Read More
  • 'थ्रीडी प्रिंटिंग'चे अनोखे तंत्रज्ञान माणूस सातत्याने नावीन्याचा ध्यास घेत असतो. हा ध्यास जगणे समृद्ध करण्याकडे असतो. कमी श्रम, कमी वेळ आणि जास्त फायदा हे गणित अलीकडे रूढ होत चालले आहे. त्यातूनच नव्या युगातील शॉपिंगची परिभाषा बदलली आहे. संकेतस्थळावरून ऑनलाइन … Read More
  • स्पर्श : ERROR    कितीही केलं तरी प्रोगाममधील एरर निघत नव्हती. त्यामुळे तो त्रागा करत चहा प्यायला बाहेर पडला. कंपनीच्या कॅंटीनपेक्षा विरंगुळा म्हणून तो बाहेरच्या टपरीवर चहा प्यायला आला. टपरीवरचा पोऱ्या कष्टांन चहा तयार करत ह… Read More

2 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...