5/18/2019

आनंदानं जगायला हवं (बोधकथा)

चार सर्वसामान्य परिस्थितीतील मित्र एकदा दूर जंगलात फिरायला निघाले. दाट झाडे, सुंदर फुले, पिवळी-हिरवी पाने पाहून त्यांचे मन प्रसन्न झाले. तेवढ्यात एक जण म्हणाला, "आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. हा निसर्ग एवढा समृद्ध आहे आणि आपल्याकडे काहीही नाही.' यावर त्या सर्वांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. शेवटी प्रत्येकाने आपण आयुष्यात निराश असल्याचे सांगितले. तोपर्यंत दुपार झाली होती. त्यामुळे सर्वांना भूक लागली. एवढ्यात जंगलात काहीच मिळणार नाही म्हणून ते केवळ पाण्याचा शोध घेऊ लागले.



पाण्याचा शोध घेता घेता त्यांना घनदाट जंगलात एक झोपडी दिसली. त्यांनी झोपडीत डोकावून पाहिले. आत एक वृद्ध स्त्री होती. तिला पाहून सर्वांना आश्‍चर्य वाटले. "आजी, आम्हाला थोडे पाणी मिळेल का?', एकाने विचारणा केली. वृद्ध स्त्री बाहेर आली आणि म्हणाली, "मी पाणी फार दूरवरून आणते. इथे जवळपास पाणी नाही. तरीही माझ्याकडे पुरेसे पाणी आहे. पण ते पाणी देण्यासाठी काही नाही. फक्त नारळाच्या छिद्र पडलेल्या करवंट्या आहेत. त्यात तुम्हाला पाणी चालेल का?', वृद्धेने विचारणा केली. "हो, हो अगदी चालेल की!', तहान लागल्याने चौघांनी एकदमच होकार दिला. वृद्धेने वेगवेगळ्या आकाराच्या तीन कवट्यांमध्ये पाणी दिले. त्यामुळे एकाने शेवटी पाणी पिले. पाणी पिऊन तृप्त झाल्यावर एक जण सहज म्हणाला. "आजी तुम्हाला इथं जंगलात छान प्रसन्न वाटत असेल ना? आम्हाला तर शहरात राहायचा आणि जगायचा कंटाळा आला आहे. रोज काहीतरी नव्या समस्या असतातच हो!' एकाने नाराजीचा सुरात माहिती दिली.

आजी म्हणाल्या, "बाळांनो, आयुष्यात कधीही नाराज होऊ नको. आता हेच बघा ना तुम्हाला आता मी ज्या करवंट्यामध्ये पाणी दिले होते. त्यापैकी तीनही करवंट्या एकसारख्या नव्हत्या. एकाला तर करवंटी मिळालीच नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्याने वापरलेली करवंटी नंतर वापरावी लागली. दोन करवंट्यांना छिद्रे पडली होती. तरीही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून पाणी पिऊन तहान भागविलीतच ना? आयुष्याचंही असच आहे. जे नाही त्यापेक्षा जे आहे त्यात समाधानी व्हायला हवं. अर्थात पुढे काहीच मिळवायचं नाही असं नाही. पण नाराजीचा, नकारात्मकतेचा सूर शक्‍यतो आपल्यापासून दूर ठेवावा. आनंदानं जगायला हवं. पुढं जायला हवं.' वृद्धेचा संदेश ऐकून तिघांनाही बोध झाला.

Related Posts:

  • संदेश (बोधकथा)) एका मोठ्या गुरूकुलात एक गुरुवर्य अध्यापन करत असत. एकदा त्यांनी सर्व शिष्यांची परिक्षा घेण्याचे ठरवले. सर्व शिष्यांना एकत्र बोलवले. सर्वांना एक फळ दिले. "तुमच्याकडे दिलेले फळ संध्याकाळपर्यंत अशा ठिकाणी जाऊन खा, की जेथे तुम्… Read More
  • भ्रमात राहु नका (बोधकथा) गौतम बुद्ध काही शिष्यांना उपदेश करत होते. "आपण जे समजतो तेच सत्य आहे, असे कधीही समजू नका. कदाचित सत्य काही तरी वेगळेच असू शकते. सतत डोळे उघडे ठेवा. जाणीवा जागृत ठेवा.' असा उपदेश बुद्धांनी केला. त्यावर काही शिष्यांना अधिक… Read More
  • शनिवारची बोधकथा: प्रेम, समाधान आणि धन 'आईसाहेब, आम्हाला जेवण मिळेल का?', शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या तीन दिव्यपुरुषांनी एका घरात आवाज दिला. आतून एक वृद्ध स्त्री बाहेर आली. तिने या तिघांकडे पाहिले. आणि हे कोणीतरी दिव्यपुरुष असल्याचे समजल्याने तिने तिघांनाही आत य… Read More
  • कष्टाचे फळ (बोधकथा) एका संयुक्‍त कुटुंबात अनेक जण एकत्र राहात होते. घरात आजोबा, आजी सर्वांत ज्येष्ठ होते. त्यांना पाच मुले होती आणि दहा नातवंडे होती. आजी-आजोबा आता खूप वृद्ध झाले होते. तरीही ते निरोगी होते. त्यांनी मुलांना आणि नातवंडांवर चांग… Read More
  • क्षमायाचना (बुद्धकथा) एका गावात एक मोठा व्यापारी होता. त्याला चार मुले होती. त्याची चारही मुले दररोज बुद्धांसमोर तीन-चार तास बसत होती. व्यापाऱ्याला प्रश्‍न पडला. मुले बुद्धांसमोर बसण्यापेक्षा दुकानात बसली तर जास्त नफा होईल, व्यापाऱ्… Read More

2 comments:

  1. very nice post I am happy to read. hello sir,
    thanks for writing this article. this is a very useful article for me.

    manish Pandey biography

    ReplyDelete
  2. शिवाराजजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार आणि आपणास शुभेच्छा!

    ReplyDelete

Related Posts Plugin for WordPress, Blogger...