"प्लिज
देवा, मला, नोकरी मिळू दे. पहिल्या पगारातील 5 टक्के वाटा तुला अर्पण
करेल. प्लिज देवा!‘ त्यानं देवापुढे हात जोडून देवापुढं प्रार्थना करत
देवाशी व्यवहारही ठरवून टाकला. फक्त त्याचं नाव "नवस‘ असं ठेवलं. मुलाखत
चांगली झाली होती. तसा तो हुशारही होता. पण घरची परिस्थिती हलाखीची होती.
कॉलेज संपून महिनाही उलटला नव्हता. निकालाची वाट पाहण्यापेक्षा त्याला
चांगली नोकरी शोधणं जास्त गरजेचं होतं. कॉलेजच्या कोणत्यातरी योजनेद्वारे
तो नोकरी करतच शिकला होता. मात्र कॉलेज संपल्यानं नोकरी संपली. शिक्षण
संपलं. आता पूर्णवेळ नोकरीतच तो पूर्ण आयुष्य घालणार होता. खिसा रिकामाच
असल्याने दररोज एका एका मित्राच्या खोलीवर राहून कसेबसे दिवस काढत होता.
यातच बाप अजूनही घरखर्चासाठी काही मागत नाही, यामुळं समाधान मानत होता.
काही दिवसांनी त्याला हवी असलेली अन् देवाकडे मागितलेली नोकरी त्याला मिळाली. त्याच्या आनंदाला आकाश कमी पडले. नोकरीमुळे याचा आत्मविश्वासही उंचावला होता. ठरल्याप्रमाणे तो नोकरीला रूजूही झाला. पहिल्या पगाराच्या भरवशावर अनेकांना आश्वासनं देत कसा बसा महिनाही भरला. पहिल्या पगाराचा दिवसही उजाडला. ठरल्याप्रमाणं पगारही मिळाला. सगळ्यात पहिल्यांदा त्यानं देवाचा नवस पूर्ण करण्याचं ठरवलं. कामाचा दिवस असल्यानं आज देवळात फार गर्दी नव्हती. पहिल्या पगारातील ठरलेली रक्कम घेऊन तो देवाला नमस्कार करून दानपेटीजवळ आला. दानपेटी खिडकीजवळ होती. सहजच त्याची नजर खिडकीतून बाहेर गेली.
दुर्धर आजारानं कुरूप झालेला एक मनुष्य दोन्ही हातांनी मंदिरातील भक्तांना मदतीची याचना करत होता. देवळातील माणसं देवाकडं पाहत होती. अन् देवळाबाहेरील याचक माणसांकडं पाहत होता. देवळातील देवासह सर्वांनाच याचकाचे हात दिसत होते. पण कोणाचेही पाय याचकाकडे वळत नव्हते. अर्थात याचकाचा अन् देवळातील लोकांचा तो नित्यक्रमच होता. दानपेटीजवळ पैसे हातात घेऊन उभ्या असलेल्या यानं एकदा देवाकडं पाहिलं. एकदा याचकाकडं पाहिलं. देव निश्चल होता. याचक चलबिचल करत होता. देव काहीच मागत नव्हता. याचक काहीतरी मागत होता. पण देवाला खूपकाही मिळत होते. याचकाला फार काही मिळत नव्हते. याने देवाला नमस्कार केला. खिडकीबाहेरील याचकाजवळ गेला. याचकाच्या हातात पैसे ठेवले. याचकाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याच आनंदाचे याच्याही चेहऱ्यावर प्रतिबिंब उमटले. तशाच अवस्थेत सांगता न येणारं समाधान घेऊन तो देवळाबाहेर पडला. पण त्याला ‘नवस‘ फिटला का नाही हे मात्र काही केल्या समजत नव्हतं.

(Courtesy: esakal.com)
0 comments:
Post a Comment