मोठ्या कष्टानं त्याचा बाप वैभव उभारण्याचा प्रयत्न करत होता. छोटे-मोठे
नोकऱ्या, व्यवसाय पडेल ते काम करून बापाने पैसा जमविला. अलिकडेच शहराच्या
जवळ जागाही खरेदी केली. आता त्यावर घर बांधण्याचं काम सुरु होतं. पत्नी आणि
दोन मुले एवढंच त्यांचं कुटुंब. दोन्ही मुलं कॉलेजात शिकत होती. थोरला
कायद्याचा अभ्यास करत होता. तर धाकटा सायन्समध्ये शिकत होता. दोन्ही
मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून बापाने त्यांच्या वेळा बघूनच
घराचं बांधकाम काढलं. दोन्ही मुलांना बांधकामावर देखरेख करण्यास ठेवले.
दोन्ही मुलं बापाचा मान ठेवत होते. त्यामुळे दोघेही मनापासून बांधकामाच्या
कामात लक्ष देत होते.
एके दिवशी वाळूचा एक ट्रक बांधकामाच्या ठिकाणी आला. आजूबाजूला जागा नव्हती म्हणून वाळू शेजारच्या एका बंगल्याच्या दारात उतरविण्यात आली. आणि बांधकाम सुरु झाले. काही वेळातच ती वेळा बांधकामासाठी उपयोगात येणार होती. आणि ती जागा रिकामी होणार होती. मात्र त्याआधीच शेजारच्या बंगल्याचा मालक बाहेर आला. आरडाओरडा करू लागला. माझ्या दारात वाळू ठेवल्याबद्दल बोलू लागला. ते पाहून दोन्ही मुलांना राग आला. ते तडक त्याच्याजवळ येऊन वाद घालू लागले. प्रकरण वाढू लागले. थोरल्या पोराने शेजाऱ्याला न्यायालयात खेचण्याची धमकी दिली. दरम्यान वाद सुरु असतानाच कोणीतरी बापाला कळविले. बाप धावत बांधकामाच्या जागी आला. दोघांचा वाद पाहून त्याने दोन्ही पोरांना बाजूला नेले. आणि शेजाऱ्याकडे येऊन हात जोडून अतिशय नम्रपणाने म्हणाला, "जागा नव्हती म्हणून एक-दोन तासासाठीच तुमच्या दारात वाळूचा ट्रक रिकामा करावा लागला. तुम्हाला आमच्यामुळे काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. अवघ्या अर्ध्या तासात तुमच्या दारातील वाळू रिकामी करतो आणि जागा पूर्ववत स्वच्छ करून देतो. कृपया तुम्ही सहकार्य करा.‘ बापाचा नरमाई पाहून शेजारीही शरमला. आणि "ठिकाय ठिकाय‘ म्हणत निघून गेला.
त्यानंतर बापाने वाळू काढून घेण्याची सूचना दिली. बांधकाम सुरु असलेल्या जागेकडे बोट दाखवून दोन्ही पोरांना बाप म्हणाला, ‘मुलांनो, आपले ध्येय ही इमारत बांधणे आहे. या शेजाऱ्याशी भांडत बसणे हे नव्हे. माणसाला आपलं नेमकं ध्येय समजत नाही. त्यामुळे सगळा गोंधळ उडतो.‘
(Courtest: esakal.com)

खूप छान... 👌👌👌
ReplyDelete