दुर्दम्य इच्छाशक्तीचा शारिरिक क्षमतांशी होणाऱ्या संघर्षामध्ये नेहमीच
इच्छाशक्तीचाच विजय होतो, हे नव्याने सिद्ध झाले आहे. कोणी कल्पनाही करू
शकणार अशी अजब, अभिमानास्पद आणि स्फुरण देणारी घटना जगाच्या इतिहासात
नुकतीच घडली आहे. इ.स. 1914 साली जन्मलेली एक 100 वर्षाची महिला दक्षिण
जपानमध्ये आजही जिवंत आहे.
वयाच्या 80 व्या वर्षी ती गुडघ्याच्या वेदनेतून शस्त्रक्रियेमुळे मुक्त झाली. एरवी एखाद्या सुशिक्षिताने वयाच्या 80 व्या वर्षी शस्त्रक्रियेचा पर्याय नाकारून इतरांकडून सेवा घेत दयेचे जीवन पत्करले असते. परंतु असल्या दयेला भीक न घालता ही महिला स्वत:च्या गुडघ्यावर पुन्हा एकदा उभी राहिली आहे. केवळ मनात प्रबळ इच्छाशक्ती होती काहीतरी करायचं! हा पुर्नजन्म सार्थकी लावायचा. चांगला विचार करणाऱ्याला अवघं विश्व सहकार्याचा हात पुढे करतं त्याप्रकाणे या महिलेलाही नियतीने साथ दिली. वयाच्या 82 वर्षांपर्यंत गुडघा पूर्ववत व्हावा म्हणून डॉक्टरांनी या महिलेला पोहण्याचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत या महिलेला पोहता येत नव्हते. मात्र, विश्रांतीऐवजी या वयात पोहण्याचा व्यायाम करण्याचे धैर्य या महिलेने दाखविले. त्यासाठी पोहण्याचा सराव केला. कामातून निवृत्ती घेण्याच्या वय उलटून 20 वर्षे झाल्यानंतर या महिलेने शास्त्रीय पद्धतीने पोहणे शिकले. आणि नित्यनेमाने व्यायाम करून पुन्हा एकदा गुडघ्यात प्राण फुंकला. खरी कहाणी इथे संपत नाही तर इथून पुढे सुरू होते.
त्यानंतर तिने जपानमधील विविध पोहण्याच्या स्पर्धेत सहभाग घेऊन जिंकण्याचा सपाटाच लावला. 2004 मध्ये या महिलेला इटलीत झालेल्या 50, 100 आणि 200 मीटर स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्याने तसेच 90 व्या वर्षी 900 मीटर फ्रिस्टाईल प्रकारात राष्ट्रीय विक्रम नोंदविल्यानंतर राष्ट्रीय जलतरणपटूचा दर्जा मिळाला. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर या महिलेने इतर औपचारिक गोष्टींच्या अक्षरश: चिंधड्या केल्या. आज (रविवार. दि. 5 एप्रिल 2015) या महिलेने वयाच्या 100 व्या वर्षी जपानमधील मत्सुयामा येथे झालेल्या मास्टर्स जलतरण स्पर्धेत 1500 मीटर अंतर एक तास 15 मिनिटे आणि 54.39 सेकंदात पार करून एक जागतिक विक्रम नोंदविला आहे. ही महिल जगातील सर्वात वयोवृद्ध जलतरणपटू झाली आहे.
यानिमित्ताने तिचे कुटुंब, तिला मिळालेल्या पुरस्काराची रक्कम, तिचा उदरनिर्वाह, तिचे प्रकृतीस्वस्थ्य, तिच्या आवडी निवडी, तिचे भावी जीवन आदी क्षुल्लक गोष्टींपेक्षा "मियको नागाओका' या महिलेच्या कर्तृत्वाला सलाम करून प्रेरणा घेणेच अधिक संयुक्तिक ठरेल.

0 comments:
Post a Comment