शाळेची घंटा वाजली. पालकांनी त्याला शाळेत आणून सोडले. रोजच्याप्रमाणे तो
शाळेत शिकू लागला, खेळू लागला, धमाल करू लागला. बघता बघता शाळेच्या
मध्यंतराची वेळ झाली. रोजच्याप्रमाणे सर्वांनी एकत्र डबे खायला सुरुवात
केली. त्याच्या बऱ्याचश्या बालदोस्तांनी आज डब्यात स्वीट डिश आणली होती.
कोणता तरी सण असल्याने ही स्वीट डिश डब्यात अवतरली होती. याच्या डब्यात
मात्र कोणताही स्वीट पदार्थ नव्हता. मात्र आईने दररोजप्रमाणे काहीतरी खास
पदार्थ देण्याचा प्रयत्न केला होता. तरीही रोज खास वाटणारा पदार्थ त्याला
आज खास वाटत नव्हता. त्यामुळे तो थोडासा नाराज झाला. तसेच आपल्या डब्यात
स्वीट डिश नसल्याचे कारण शोधू लागला. त्याला आईचा थोडासा रागही आला.
दरम्यान त्याने स्वीट डिशचे कारण आपल्या एका क्लोज फ्रेंडकडून जाणून घेतले. कोणता तरी सण होता असे त्याला समजले. काहीवेळाने त्याला शोध लागला की तो सण याच्या घरी नसतो. तो का नसतो? असा प्रश्न त्याला पडला. पुन्हा क्लोज फ्रेंड उपयोगी पडला. त्याला उत्तर मिळाले कि की त्याचा धर्म वेगळा आहे. मग तो कोणता आहे? हा प्रश्न त्याला स्वस्थ बसू देईना. अशातच मध्यंतर संपले आणि शाळा सुरू झाली. इवल्याश्या जिवाला ‘आपला धर्म कोणता?‘ हा प्रश्न स्वस्थ बसू देईना. मात्र, त्याच्या मनातील प्रश्नाचे उत्तर सापडले नाही. क्लोज फ्रेंडही त्याचं फारसं समाधान करू शकला नाही. आता हा प्रश्न आपल्या आईला विचारायचा, असा निग्रह करून तो शाळा सुटण्याची तसेच आईला भेटण्याची वाट पाहू लागला. बघता बघता शाळा सुटली. आई आली. आता तो ‘आपला धर्म कोणता?‘ हे विचारण्यासाठी धावत आईकडे जाऊ लागला. ज्याचं उत्तर त्याच्या आयुष्यावर परिणाम करणार होतं. आई त्याला कुठलं तरी एक नाव सांगणार होती. अर्थात् आई खरंखुरं उत्तर देणार होती. पण ‘तू माणूस आहेस आणि माणुसकी हा तुझा धर्म आहे‘ असं आईचं उत्तर असेल का?
(Courtesy: esakal.com)

0 comments:
Post a Comment